अध्यक्षाचे मनोगत....

प्रथमत: सर्व यशस्वी छात्र शिक्षकाचे मनापासून  हार्दिक स्वागत आहे. विद्याथी मित्रांनो शिक्षक म्हणून आपण एका नव्या जीवनात व पवित्र व्यवसायामध्ये पदार्पण करीत आहात हि आनंदांची बाब आहे.

     एक चांगला शिक्षक समाज व राष्ट्र घडविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतो. चांगला शिक्षक होण्यासाठी या महाविद्यालयातून वर्षेभर विविध उपक्रम राबविले जातात. जेणे करून काही कौशल्य तुमच्यात आत्मसात होऊन त्यातून स्वतःचा व विद्यार्थ्याचा विकास होत असतो.

हे सर्व उपक्रम व त्यातून विविध कौशल्य यांची रुजवणूक या महाविद्यालयतील प्राध्यापक प्रामाणिकपणे करीत असतात. तुम्ही जेवढ्या प्रमाणात उपक्रमात सहभागी व्हाल तेवढे तुमचे अनुभव व  समृद्ध होईल.

     महाविद्यालयाला लाभलेल्या  आदरणीय प्राचार्या डॉ.एम.एम. याज्ञिक हे शिक्षणतज्ञअसून त्यांचे आता पर्यंतचे कार्य हे उल्लेखनिय आहे. त्यांच्या अनुभवातूनच आपल्या महाविद्यालची यशाची परंपरा टिकून आहे. प्राचार्याच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्की होणार आहे.

     तरी भावी शिक्षकांना बी. एड. प्रशिक्षणाचे हे वर्ष उज्वल व यशाचे आणि कीर्तिमान होवो हि शुभेच्छा....!

            प्रा. डॉ. सरनाईक एम.एन.      

अध्यक्ष

                                                                    ज्योतिबा शिक्षण संस्था, औरंगाबाद.