ज्योतिबा शिक्षण संस्था
औरंगाबाद,संचालित एन.टी.एस. अध्यापक महाविद्यालय परभणी या महाविद्यालयाची स्थापना
जून २००६ रोजी झाली. संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा.डॉ.मधुसुदन नारायण सरनाईक हे आहेत. त्यांचा शिक्षण
क्षेत्रातील प्रगाढ अनुभव लक्षात घेऊन व स्वतची शिक्षण विषयक निश्चित स्वरुपांची ध्येय
धोरण राबविण्याच्या दृष्टीने प्रस्तुत महाविद्यालयाची स्थापना करताना संस्थचे
ब्रीदवाक्य “ENTER FOR LEARN EXIT FOR SERVE” म्हणजेच या
महाविद्यालयात अध्यायनासाठी देशाची सेवा करण्यासाठी परिपूर्ण असा नागरिक तयार
व्हावा या दृष्टीने महाविद्यालयाची शेक्षणिक वाटचाल चालू आहे. महाविद्यालयाची
यशस्वी परंपरा ही महाविद्यालयाच्या विद्यापीठीय वार्षिक परीक्षेच्या निकालवरून
प्रतीबिंबित होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व
अभ्यासानुवरर्ती कार्यक्रम राबविण्यात
येते. महाविद्यालयातून बौद्धिक विकासाबरोबरच भावनात्मक विकास होण्यासाठी महाविद्यालयात
विविध उपक्रम व स्पर्धाचे आयोजन केले जाते. महाविद्यालयाची वास्तू हि शहराच्या मध्यभागी,
वसमत रोडवर असल्यामुळे विद्याथ्याना विशेषत मुलांना महाविद्यालयात जाणे-येणे हे
सोयीस्कर व सुरक्षित होते. त्यामुळे प्रस्तुत महाविद्यालयात प्रवेश होण्यासाठी विद्याथी
हे उत्सुक असतात. आपण या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल संस्था, प्राचार्य व
कार्यालयीन कर्मच्या-या तर्फे हार्दिक स्वागत.